Homeगडचिरोलीबाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार / इथे पाठवा अर्ज

बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार / इथे पाठवा अर्ज

 

दि.15 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत, मुले व मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना संधी

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार हा मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तर संस्था स्तरावर बालकल्याण विकास क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

बाल शक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार सन 2021 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. सदर पुरस्काराची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास, अधिकारी गडचिरोली येथे संपर्क करावा.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!