इंडीया दस्तक न्यूज टिव्ही स्पेशल रिपोर्ट
कार्यकारी संपादक / रवी रायपुरे
चंद्रपूर शहरालगतच्या पठाणपुरा गेट ते माना टेकडी या मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या शवदहन निवाऱ्यात कोरोना बाधित रुग्णांवर आरोग्य विभागाकडून रात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार केल्या जात आहे. सदर रस्त्याने चंद्रपुरात तील पठाणपुरा, जोड देऊळ, दादमहल, लालपेठ कालरी वसाहत, भिवापूर या वसाहतीतील हजारो लोक माॅर्निंगवाक साठी येत असतात.
त्याचप्रमाणे डब्ल्यूसीएल ला जाणारे कर्मचारी, माना, हळस्ती, चारवड,शिवनी या गावातील लोक सुद्धा याच मार्गाने जात असतात.परंतु आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णाचे अंत्यसंस्कार रस्त्यालगत करीत असल्याने व परिसरात कोणत्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण त्याचप्रमाणे सानीटायझर होत नसल्याने आजुबाजुस व रस्त्यावर करोना विषाणूंचा प्रादुर्भाव नाकारता येणार नाही असा समज माॅर्निंगवाक करणाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने,त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर प्रकाराची माहिती देण्यासाठी घटनास्थळावर आमच्या प्रतिनिधीला बोलावून होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य माॅर्निंगवाक करणा-यांनी व्यक्त केले.त्यात एडव्होकेट ईश्वरकर मॅडम, चोपणे बाबूसाहेब, विजय पराते, अशोक आक्केवार, सतीश चन्ने, सुनील मुन, अभय सिंगाभट्टी व इतर मार्निंगवाक करनारे उपस्थित होते. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही. कार्यकारी संपादक रवी रायपुरे






