मूकबधिर विद्यार्थ्यांना घडली मीना बाजार ची सैर…

66

पोलिस विभाग आणि सामाजिक संस्थेचा पुढाकार

प्रतिनिधी प्रीतम गग्गुरी अहेरी

समाजातील दुर्लक्षित मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी अहेरी येथे पोलिस विभागाच्या मदतीने आणि सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने मूकबधिर विद्यार्थ्यांना एस आर मीना बाजार ची सैर करविण्यात आली.

अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे,पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मदतीने तसेच हेल्पिंग हँड्स सामाजिक सेवा संस्था अहेरी यांच्या पुढाकाराने अहेरी येथील एकलव्य मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकी ग्राउंड स्थित एस आर अम्युजमेंट पार्क अर्थात मीना बाजार ची सैर करविण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आकाश पाळणा, ड्रॅगन,रेल्वे गाडी सह सर्व गेम आणि विविध पाळण्याचा आनंद लुटला.तसेच पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी विद्यार्थ्यांना नाश्ता,आइस्क्रीम आणि आणि दैनंदिन उपयोगी सामानाची सोय केली. विद्यार्थ्यांनि हावभाव बोलीभाषेत अजय कोकाटे आणि हर्षल एकरे यांचे आभार मानले तसेच एस.आर.अम्युजमेंट पार्क चे संचालक समीर शेख नांदेड,मोहम्मद अशपाक नागपूर,सोहेल पोठीयावाला यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आणि सैर करविली.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे,पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक वळवी,पोलिस उपनिरीक्षक येवले,पोलिस हवालदार प्रशांत कांबळे,पोलिस शिपाई फय्याज शेख,पोलिस हवालदार करमे,हेल्पिंग हँड्स चे सचिव शंकर मगडीवार,उपाध्यक्ष पूर्वा दोन्तुलवार,नितीन दोन्तुलवार,उमेश गुप्ता,एकलव्य मूकबधिर निवासी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी,इतर शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.