Home Breaking News नवेगाव येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकासह शेतकरी मार्गदर्शन सभा…

नवेगाव येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकासह शेतकरी मार्गदर्शन सभा…

17

नवेगाव येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकासह शेतकरी मार्गदर्शन सभा.

प्रतिनिधी विशाल शेंडे

राजुरा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान (सी.आर.टी) अभियान राबविण्यात येत असून, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मौजा नवेगाव, ता. राजुरा येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात रुंद वरंबे (बेड) तयार करणे, टोकन पद्धतीने लागवड करणे, शून्य मशागत पद्धत तसेच आंतरपीक पद्धती यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच रुंद वरंबे तयार करणे आणि टोकन पद्धतीने लागवड करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची समज सुलभ पद्धतीने करून देण्यात आली.ही सभा तंत्रज्ञान समन्वयक शुभम फरकाडे, सहाय्यक कृषी अधिकारी राजू कातकडे आणि समूह सहाय्यक आदर्श खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमास कृषी ताई, ग्राम कृषि विकास समितीचे सदस्य तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी या उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे आधुनिक व हवामानानुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

Don`t copy text!