Advertisements
Home गडचिरोली गडचिरोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्याची दुरव्यवस्था ; स्थानिक नागरिकांना रस्त्याने जाताना...

गडचिरोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्याची दुरव्यवस्था ; स्थानिक नागरिकांना रस्त्याने जाताना जीव हातात घेऊन करावे लागत आहे प्रवास

गडचीरोली

Advertisements

गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्ते खोदून गटार कामा साठी जागोजागी अर्धवट काम करून ठेवलेले आहेत त्यामुळे पाऊस आला की पूर्णता रस्ते चिखलमय झालेले दिसतात, चिखल तुडवत विद्यार्थांना व स्थानिक नागरिकांना जावे लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा मुलामा देण्याची कार्य पण केले, मात्र मुरुमामुळे रस्ता पावसात आणखी चिखलमय होत आहे, स्थानिक रेड्डी गोडउन चौक, लांजेडा येथील सरकारी मुलींचा वसतिगृह, विवेकंदनांगर इत्यादी परिसरातील जागोजागी गटार चे चेंबर्स रस्त्याच्या मधोमध उभे असल्यामुळे तसेच काही ठिकाणी रास्तावर गिट्टी टाकून ठेवलेली आहे, दुचाकी वाहनधारकांना श्वासाचा, कमरदुखीचा, मानेचे त्रास सारखे त्रास सहन करावा लागत आहे, खोदून ठेवलेल्या रस्त्याला कुठलेही caution बोर्ड, वॉर्निंग टेप सारखे दर्शक लावलेले दिसत नाही त्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होण्याच्या दाट शक्यता आहे ,मात्र या सर्व बाबींकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, सर्वत्र नागरिकांमध्ये शहरामधील या गटार लाईन च्या अर्धवट कामा करिता असंतोष आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास रस्ते बांधकामांसाठी व सुधारीकरणासाठी सर्वाधिक निधी मिळतो. दरवर्षी रस्त्यांचे बांधकाम व डागडुजी होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अल्पावधीतच रस्ते उखडून जातात त्यात अनेकदा किरकोळ तसेच मोठे अपघात घडत असताना दिसून येतात. शहरातील चंद्रपूर रोड, चामोर्शी रोड, धानोरा रोड मार्गावर नवीन काम चालू आहेत पण वर्ष उलटून गेले तरीही काम पूर्ण झालेली नाही, तसेच बऱ्याच ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम दिसून येत आहेत. त्यामुळे जड व चारचाकी वाहनधारकांना तसेच दुचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः लक्ष देऊन उत्कृष्ठ दर्जाचे काम कंत्राटदाराकडून करून घ्यावे. नगरपालिका प्रशासनाने वेळीच रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करून रस्त्यांवर खड्डे पडणार नाही व नागरिकांना दळणवळणचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

जुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...

शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक

प्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...

सीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!