Home Breaking News रक्तदान करून नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट अध्यक्षांनी जपली सामाजिक बांधिलकी…

रक्तदान करून नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट अध्यक्षांनी जपली सामाजिक बांधिलकी…

27

रक्तदान करून नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट अध्यक्षांनी जपली सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्ली : माणुसकीचे दर्शन घडवत एटापल्ली नगर पंचायतचे नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट एटापल्लीचे अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार यांनी सहकाऱ्यांसह रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

लॉयड्सच्या काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या सुमित्रा बिश्वास (मु. येमली, पो. बुर्गी, ता. एटापल्ली) यांना रक्ताची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच राघवेंद्र सुलवावार यांनी तत्काळ पुढाकार घेत अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान केले तसेच इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले.

या प्रसंगी आशिष बक्षी, व्यंकटेश गड्डमवार, मनोज बेपारी व साधन मिस्त्री यांनीही रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. रक्तदानामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला असून उपस्थितांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले.

“रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवून गरजूंसाठी पुढे यावे,” असे आवाहन नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार यांनी यावेळी केले.

Don`t copy text!