Advertisements
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने जाळला अर्णब गोस्वामी चा पुतळा

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने जाळला अर्णब गोस्वामी चा पुतळा

गृहमंत्री मा.अनिल देशमुख व महाराष्ट्र पोलीसांवरील अभद्र अपमानजनक टिपणी चा निषेध :- नितीन भटारकर

Advertisements

चंद्रपूर

न्यूज चॅनल रिपब्लिक भारत चे अर्णव गोस्वामीनी सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणी “राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख व महाराष्ट्र पोलिसांच्या” विरोधात अभद्र व अपमानास्पद टिप्पणी केल्याने राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी अर्णव गोस्वामी चा निषेधार्थ घोषणाबाजी करीत पुतळा जाळला.


विरोध प्रदर्शनादरम्यान जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सांगितले की देशावर आलेल्या कोरोना सारख्या संकट व महाआपत्तीवर अगोदर एकत्रितपणे लढण्याची गरज असून यात सत्तराव्या वर्षांत असणारे राज्याचे गृहमंत्री ह्यांनी स्वतः ला झोकून संपूर्ण राज्य पिंजून काढले तसेच महाराष्ट्र पोलिसांनी देखील या लढ्यात अतुलनीय कामगिरी केली, कोरोनाच्या या लढ्यात अनेक पोलिस बांधव शहिद झाले या मुळे यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची देखील भावना आहे, परंतु गरज नसताना स्वतः ला मोठं करण्याचा नादात या “महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री व महाराष्ट्र पोलिस बांधवावर” अभद्रपणे टिपणी करणे निषेधार्य आहे. ज्या पोलिसांची स्कॉटलँड-यार्ड पोलिसांशी तुलना केल्या जाते त्या महाराष्ट्र पोलिसांवर आम्हा सर्वांना अभिमान आहे. मराठी व महाराष्ट्राचा अपमान करणारे व खिल्ली करणारे वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही. व म्हणून अर्णव गोस्वामी च्या पुतळ्याचे दहन आज केले.
सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असुन सदर आंदोलनात रा.वि.का. जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रा.यु.का. शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, मिडिया सेल जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, जिल्हा सचिव अभिनव देशपांडे, उपाध्यक्ष संजय ठाकूर, किसन अरडळे, कुणाल ठेंगरे, प्रफुल्ल कुचनकर, राहुल भगत उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!