उमेदच्या महिलांनी थाटला मटण व्यवसायाचा उधोग जिवन्नोती ग्रामीण अभियानांतर्गत माहीलांचे ऊपक्रम

652

 गोंडपिपरी :- आकाश चौधरी

महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.शिक्षण,नौक री,उद्योगधंदे ईत्यांदी क्षेत्रात महिला बरोबरीत आहेत.यातच पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन ती संसाराचा गाडा देखिल तेवढ्याच ताकतीने खेचत असल्याचे चित्र आहे.अश्यातच आता महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन्नोनत्ती अभियानाअंतर्गत (उमेद) गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात “मटन” शाॕपचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.महिला उत्पादक गटातर्फे या दुकानातुन आता मटनाचा व्यवसाय सुरु झाला आहे.उमेद अभियानाअंतर्गत जिह्यातील हा पहिला प्रयोग आहे.

महिला सक्षमिकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे.याच उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोत्ती अभियानाचे (उमेद) कार्य सुरु आहे.गोंडपिपरी तालुक्यात देखिल या अभियानाअंतर्गत जोरात काम सुरु आहे.अश्यातच सहा महिण्यापुर्वी या अभियानाअंतर्गत महिलांच्या शेळी उत्पादक गटांची निर्मिती झाली.तालुक्यात विविध घटकांवर कार्यरत असलेल्या २१ गटांना कर्जरुपात अर्थपुरवठा करण्यात आला.यात राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शेळी उत्पादक गटांनी शेळी पालनाचा धंदा सुरु केला.व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातुन प्रारंभी शेळी,बोकडांची खरेदी केली.सहा महिण्यापुर्वी सुरु केलेला हा व्यवसाय आता अर्थाजनासाठी सज्ज झाला.शुक्रवारी विठ्ठलवाडा येथिल नवनिर्माण शेळी उत्पादक गटाने “मटन” शाॕपचा शुभारंभ केला.विठ्ठलवाड्यातील विश्वशांती ग्रामसंघाने जिल्ह्यातील पहिलाच हा प्रयोग सुरु केला आहे.

यावेळी अभियानाच्या तालुका व्यवस्थापक ममता गोरघाटे,नरेंद्र मेश्राम,प्रतिक्षा खोब्रागडे,मिनाक्षी उराडे,किशोर हिंगाणे,प्रकाश रामटेके,मंजु कांबळे,नवराज चंद्रागडे,यांचेसह विठ्ठलवाड्यातील उत्पादक गटाच्या महिला शालु बावणे,रजणी ताजणे,वैशाली लोहकरे,अर्चना चंद्रगिरीवार,दिपा ताजणे,माधुरी रामटेके,कौशल्या पवार आदिंची उपस्थिती होती.