-नितेश खडसे (जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली)
गडचिरोली जिल्हा यापूर्वी च्या आठवड्यापर्यंत लेव्हल -3 मध्ये मोडत होता परंतु 17 जून च्या रिपोर्ट नुसार आता लेव्हल -1 मध्ये मोडत असल्याने निर्बधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आज पासून सर्व दुकाने सकाळी 7 वाजतापासून ते रात्रो 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 20 जून रोजी निर्गमित केले आहे.
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते रात्रो 7 पर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच माॅल व सिनेमागृहे सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील तर रेस्टाॅरेंट, उपहारगृहे सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन इत्यादी गर्दीची ठिकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत कोविड नियमांच्या आधीन राहून 50 टक्के क्षमतेच्या आत व जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थितीत परवानगी असेल. शासकीय कार्यालयांमधील 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. तसेच विवाह कार्यक्रमाला कमीत कमी 100 तर अंत्यविधीस 50 लोकांच्या उपस्थितीतस मान्यता देण्यात आली आहे. उल्लंघन केल्यास पन्नास हजार रुपये दंड ठोठावला जाईल.
कृषीविषयक दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुरू राहण्यास पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी कोणत्याही पास ची गरज नही परंतु लेव्हल 5 मध्ये असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ई-पास असणे गरजेचे आहे. आठवडी बाजार भरतील किंवा नाही या बाबत अजूनही या पत्रात उल्लेख केलेला नाही.
आजपासून सर्व दुकाने सायं ७ वाजेपर्यंत राहणार सुरू…गडचिरोली जिल्ह्याचा लेवल-1 मध्ये समावेश…
RELATED ARTICLES