मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या तर्फे योग दिन साजरा…

0
151

चंद्रपूर: मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे आणि तालुका सहायक अधिकारी नितेश मालेकर यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग दिनानिमित्ताने चंद्रपूर तालुक्यातील पिपरी, धानोरा, अरवाट , मारडा, दाताला, बाबूपेठ, वेडली या गावांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. कोविड सारख्या परिस्थितीत सुध्दा विद्यार्थांना योगाचे महत्व पटवून देण्याकरिता मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चा हा उपक्रम आहे. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता शाळा सहायक अधिकारी शंकर पुरडकर यांनी मेहनत घेतली. तसेच समूदाय समन्वयक म्हणून आचाल बावणे,गायत्री वासाडे,वैभव मेश्राम, दर्शन धानके,पल्लवी देठे,स्नेहल श्रीकोंडावर ,आदर्श चिवांडे, करिष्मा देवाळकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here