जोगीसाखरा येथे योग दिन साजरा…

0
264

गौरव लुटे प्रतिनिधी

Advertisements

जोगीसाखरा –
आज जोगीसाखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. योग म्हणजे मन, बुद्धी आणि शरीराचे प्राणायामाने मिलन. योगसाधनेमुळे मनाची चंचलता स्थिर करण्यात व मन एकाग्र करण्यात खूप मोलाची भुमिका बजावत असते.योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो आपण नित्यनियमाने दररोज करायला हवा.आरोग्य हीच आपली संपत्ती आहे.पंधरा – वीस हजारा वर्षांपूर्वी साधू , महंतांनी योग साधनेचे महत्त्व लोकांना पटवून दिले.श्वासावरची खरी गती आपल्याला प्राणायामाद्धारेचं कळत असते… असे मार्मीक शब्दात मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे वनविभाग अधिकारी मा. भुषण सिंह खंडाते सर यांनी केले.
योग दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात लोकांना योग ,प्राणायामाचे धडे दिले तसेच पद्मासन, अनुम्म मल्लुम, प्राणायाम यांचे महत्त्व आपल्या जिवनातील अमूल्य कशाप्रकारे आहेत , दररोज किमान किती तास योग करावा, तंदुरुस्त रहाण्यासाठी योग, प्राणायाम व्यायाम किती गरजेचे आहेत असे योगशिक्षिका ज्योती खेवले मॅडम यांनी भाष्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक व मनोगत योगशिक्षका ज्योती खेवले मॅडम नी केले.या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून वनविभाग अधिकारी मा.भूषणसिंग खंडाते सर होते.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जोगीसाखरा येथील ही.एच.ओ.शालिनी हत्तीमारे मॅडम , सिस्टर चिलबुले मॅडम ,आशा वर्कर ममता मेश्राम व गावातील प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते. मंचावरील पाहुण्यांचे स्वागत वृक्ष भेट देवून करण्यात आले.आणि दिलेली भेट वृक्ष लावून त्यांचे संगोपन करून संवर्धन करणे या विषयी हमी सुध्दा देण्यात आली. हे विशेष .
योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गौरव लुटे यांनी केले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here