Homeगडचिरोलीप्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथील कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय कामबंद संप...

प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथील कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय कामबंद संप…

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी दिनांक 29 मे रोजी आपआपल्या मासिक वेतन संबंधीत एकदिवसीय काम बंद संप पुकारला आहे
कामबंद संप करण्याचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ उमाकांत मेश्राम याना दिले असून त्या नंतर सर्व कर्मचाऱ्यांनि आरोग्य केंद्रा समोर बसून संप पुकारला.
या वेळी आंदोलन करते कर्मचारी यांची समस्या अशी आहे
मार्च 2021 पासून वेतन झाले नसून त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून त्यांची काम करण्याची मानसिकता नसून त्यांनी हा एक दिवसीय काम बंद संप पुकारला आहे
तसेच काही कर्मचाऱ्यांचे lic चे रक्कम माहे जुलै 2017 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत वेतनातून कपात झाली असून अजूनही त्यांच्या lic खात्यात रक्कम जमा झाली नाही
त्यामुळे सर्व कर्मचारी चिंतेत असून त्यांची आत्ता काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही.

कारण असे की एखाद्या कर्मचाऱ्यांला मृत्यू ओढवल्यास lic कडून मिळणारा लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळणार नाही हे नक्की व तो कर्मचारी त्या लाभागापासून वंचिंत राहील हे नक्की तरी वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ या सर्व कर्मचाऱ्यांचे समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथिल सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!