-शरद कुकूडकार (प्रतिनिधी भंगाराम तळोधी)
गोंडपीपरी- गोंडपीपरी तालुक्यातील ग्रामपंचायत हिवरा चे कर्तव्यशील सरपंच निलेश पुलगमकर याची ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दि.29 मे रोज शनिवारला विदर्भ विभाग सरचिटणीस पदीनिवड करण्यात आली आहे.
या संबधीचे नियुक्ती पत्र सुद्धा त्यांना पाठविण्यात आले आहे.
ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य हा संघ
ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे सरपंच , उपसरपंच, व सदस्य यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील सर्व घटकांपर्यन्त पोहविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे.
तरी ग्राम संवाद सरपंच संघ च्या नेमून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून गावाचा विकास साधावा! या हेतूने
महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाच्या वाढी करिता व गावाच्या विकासाकरिता विदर्भ विभाग सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. *शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी*