Home गडचिरोली गडचीरोली जिल्हयात चोवीस तासात 77 जण कोरानामुक्त

गडचीरोली जिल्हयात चोवीस तासात 77 जण कोरानामुक्त

1082

तर नवीन 33 कोरोना बाधित

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी गेल्या चोवीस तासात जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 77 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोलीमधील 27 जणांचा समावेश आहे. सिरोंचा 12, चामोर्शी 11, कुरखेडा 5, अहेरी 1, आरमोरी 1, धानोरा 11, कोरची 1, मुलचेरा 2 व वडसा 6 जणांचा समावेश आहे. तर नवीन 33 बाधितांमध्ये गडचिरोली 18, चामोर्शी 4, मुलचेरा 1, अहेरी 2, आरमोरी 1, धानोरा 3, वडसा 1, सिरोंचा 1, कोरची 1 व भामरागड 1 जणाचा समावेश आहे.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 493 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 1957 रूग्णांपैकी 1454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

*सक्रिय रूग्ण 493 पैकी 220 गडचिरोली तालुक्यातील* : एकुण सक्रिय 493 रूग्णांपैकी सर्वांत जास्त रूग्ण गडचिरोलीमधील आहेत. एकुण 220 रूग्ण म्हणजे इतर तालुक्यांच्या तुलनेत 45 टक्के रूग्ण एका तालुक्यात आहेत. इतर सर्व तालुक्यात मिळून उर्वरीत 55 टक्के रूग्ण आहेत. यात चामोर्शी, वडसा, सिरोंचासह आरमोरी तालुक्यात जास्त प्रमाण आहे तर इतर तालुक्यात कमी प्रमाण आहे.

Don`t copy text!