Homeगडचिरोलीमुतनूर देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी नागरिकांची मागणी...

मुतनूर देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी नागरिकांची मागणी…

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: मुतनूर पहाडी‌ देवस्थान हे चामोर्शी मुख्यालयापासून २४ किमी.अंतरावर असलेल्या पावीमुरांडा ग्रामपंचायत अंतर्गत मुतनूर हे छोटेसे गाव आहे. पहाडीच्या खाली बसलेल्या मुतनूर या गावाला जिल्ह्यातील व बाहेरून अनेक पर्यटक येत असल्याचे दिसून येत आहे.डोंगरावर चढायला काही अंतर पायऱ्या आहेत व पुढे मोठमोठे दगड असून अरुंद पायवाट सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतर पायी चालावे लागते.

पहाडीवर गेल्यावर विहंगम दृश्य पाहावयास मिळते. पहाडी अत्यंत उंच असल्याने इथे वातावरण थंड असते त्यात जंगलांनी वेढलेला हा परिसर अत्यंत रमणीय आहे. मुतनूर परिसरात आदिवासी बहुल असून याठिकाणी आदिवासी बांधवांनी भगवान शिव पार्वती व आदिवासीचे दैवत कुपारलिंगो यांच्या प्रतिमा स्थापन केली आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला मुतनूर पहाडीखाली वसलेल्या गावात दोन दिवस जत्रा भरते.

तरी मुतनूर या गावाला पर्यटक स्थळ घोषित करून या गावाची सोंदर्य करण करावी अशी मागणी पाविमुरंडा, मुतनूर, कोठरी, पोटेगाव परिसरातील नागरिकांना कडून केली जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!