Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा संपन्न...

गोंडपिपरी येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा संपन्न…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
गणराज्य दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडीच्या वतीने स्थानिक कन्यका मंदिरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार ,माजी आमदार संजय धोटे , महिला आघाडी च्या अध्यक्षा सौ उमाताई खापरे ,जिप अध्यक्षा सौ संध्याताई गुरुनुले ,सौ वनिता कानडे ,पं स सभापती सुनीता मेग्गेवार ,इ ची प्रमुख उपस्थिती होती .
सदर महिला मेळाव्यात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या ,साफसफाई कर्मचारी म्हणून कार्य करणाऱ्या ,फूटपाथवर छोटी दुकाने टाकून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या , कोरोना उपसर्ग काळात सेवा देणाऱ्या ,पोलीस विभागात सेवा देणाऱ्या या साऱ्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
प्रचंड उपस्थितीत संपन्न झालेल्या महिला मेळाव्याचे प्रास्ताविक अरुणाताई जांभुळकर यांनी केले .संचलन दमयंती वाकडे ,मनीषा मडावी आणि दिवसे मॅडम यांनी केले .
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अंजनी खांडरे ,अश्विनी तोडासे ,गौरी वेगीनवार ,प्रियांका रासमलवार ,अल्का फलके ,किरण नगारे ,सरिता पुणेकर ,धीरा गौर ,सुषमा तोडासे ,कविता नागपुरे इ नी अथक परिश्रम घेतले .
या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे समस्त महिलावर्गाला प्रथमतःच शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची पालखी काढून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!