भीषण अपघात : पिकअपच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी : धाबा-पोडसा (तेलंगणा) मार्गावर वेडगाव बसस्टॉपजवळील पुलावर आज दि. १७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात दहावीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेडगाव येथील ओम अनिल धुडसे (वय अंदाजे १५-१६ वर्षे) हा आपल्या मित्रासोबत पहाटे फिरण्यासाठी पुलावर गेला होता. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत ओम गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणी पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू असून, फरार वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.







