Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घोट येथे नाश्ता वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घोट येथे नाश्ता वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला

309

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाश्ता वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला
घोट (प्रतिनिधी – गौरव बुरांडे): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक नागरिकांच्या वतीने नाश्ता वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या उपक्रमाचे आयोजन समाजातील गरजू व प्रवाशांना मदत करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच कामगारांना नाश्त्याचे पॅकेट वाटप केले.
हा नाश्ता वाटपाचा कार्यक्रम राकेशभाऊ भैंसारे व पत्रुभाऊ गेडाम यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. आयोजकांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
या वेळी उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे सामाजिक कार्यक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Don`t copy text!