आज तू हवी होतीस शीतल, डॉ.विकास आमटे यांची भावनिक पोस्ट…

0
433

चंद्रपुर: “शीतल आज तू हवी होतीस,” अशी भावनिक पोस्ट डॉ. विकास आमटे यांनी केली आहे. महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन टोचून डॉ. शीतल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेमुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा काल म्हणजे (26 जानेवारी) ला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विकास आमटे यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. “आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे विकास आमटे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत त्यांनी शीतल आणि त्यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here