जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र जारावंडी परिसरातील काही गावे बनलीआहे .गत अनेक दिवसांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश आहे
जारावंडी परिसर आदिवासी बहुल असून याचा फायदा गो तस्कर घेत आहेत,अश्याने जनावरांचे नामशेष होणाच्या मार्गावर आहेत. आज शेती करतांना यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी जारावंडी परिसरात बहुतांश शेतकरी बैल रेडा यांच्या साहाय्याने शेती करतात ,त्यामुळे पशुधनाचे महत्व आजही कायम आहे,परिसरात जनावरांचे योग्य रीतीने सांभाळ केला जातो,त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे,नेमकी ही बाब लक्षात घेऊन गो तस्करांनी जारावंडी येथे गो तस्करीचा अड्डा बनवून जनावरांना कत्तलखान्यात पाठवल्या जात आहे
जारावंडी पोलीस ठाण्यांतर्गत दिंडवी,सोहंगाव,हनपायली, रोपी,मंजिगड, येथे रस्त्यावर शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते.यात गावातील पाटलांचा चांगलास गो तस्करांना आशीर्वाद असल्याचं समजते.
या ठिकाणी जारावंडी परिसरातील गावांतून आणि छत्तीसगड वरून जनावरे आणली जातात. जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु आहे. विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे. रस्त्याने जनावरांची दर दिवस मोठ्या ट्रक ने वाहतूक भरधाव वेगाने केली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो.
जारावंडी परिसरातील गावातून व छत्तीसगड वरून जनावरे पायी जारावंडी, रोपी दिंडवि सोहंगाव मंजिगड वडसाकला, हनपायली येथे आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात.यात आंध्रप्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातील येथील जवळपास 30 ते 40 व्यापारी जारावंडी येथे भाड्याने रूम घेऊन राहत असल्याचे दिसते
विशेष म्हणजे पोलीस स्टेशन जारावंडी आणि परिसरातील गावामध्ये हे सर्व प्रकारसुरू आहे यात जारावंडी येथे वन उपज तपासणी नाका आहे आणि स्त्यालगत सी सी टीव्ही कॅमेरे आहेत आणि पेंडरी, गटा, कारवाफा चातगाव गडचिरोली समोर चंद्रपूर मार्गाने वाहतूक केली जात आहे या मार्गावर शेकडो पोलीस स्टेशन आणि वन नाके येतात परंतु आज पर्यंत कोणतेच कारवाही झालेली नाही म्हणून पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत आहे
*यांना अभय कुणाचे?*
गो तस्कर बाहेर जिल्ह्यातून येऊन थेट जारावंडी व परिसरातील गावांमध्ये वास्तव्यास आहेत आणि भर दिवसा गुरांची ने आन करत असतात अश्यात त्यांना विचारांनी केली असता ,म्हणतात तुम्हाला जे करायचे आहे ते करा ,काय करणार जास्तीस जास्त ठाण्यात सांगणार असे ठणकावून सांगितले जातात ,म्हणून गोतस्कराबद्दल आम जाणते मध्ये प्रश्न निर्माण होत आहे,की याना अभय कुणाचे आहे
जारावंडी परिसर ठरतोय जनावरे तस्करीचा अड्डा
जारावंडी परिसरातील रोपी,मंजिगड,सोहंगाव मंजिगड हनपायली आणि छत्तीसगड राज्यातील मारोडा ही गावे गाय बैल चोरी करण्याचा अड्डा बनला आहे
येथील काही लोक त्यांचे सूत्रधार आहे,ते गावातील व परिसरातील साथीदारामार्फत जनावरांची खरेदी,चोरी करतो, प्रत्येक दिवशी कत्तलखान्यात रवानगी केली जाते ,यासाठी चंद्रपूर व हैद्राबाद वरून पैसे येत असल्याचे बोलले जात असून यातून मोठ्याप्रमाणात उलाढाल होत असल्याचे कळते
जारावंडी परिसरात जनावरांची तस्करी जोमात…
RELATED ARTICLES