Advertisements
Home क्राईम जारावंडी परिसरात जनावरांची तस्करी जोमात...

जारावंडी परिसरात जनावरांची तस्करी जोमात…

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

Advertisements

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र जारावंडी परिसरातील काही गावे बनलीआहे. गत अनेक दिवसांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश आहे.
जारावंडी परिसर आदिवासी बहुल असून याचा फायदा गो तस्कर घेत आहेत,अश्याने जनावरांचे नामशेष होणाच्या मार्गावर आहेत. आज शेती करतांना यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी जारावंडी परिसरात बहुतांश शेतकरी बैल, रेडा यांच्या साहाय्याने शेती करतात. त्यामुळे पशुधनाचे महत्व आजही कायम आहे. परिसरात जनावरांचे योग्य रीतीने सांभाळ केला जातो. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन गो तस्करांनी जारावंडी येथे गो तस्करीचा अड्डा बनवून जनावरांना कत्तलखान्यात पाठवल्या जात आहे.
जारावंडी पोलीस ठाण्यांतर्गत दिंडवी,सोहंगाव,हनपायली, रोपी,मंजिगड, येथे रस्त्यावर शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते.यात गावातील पाटलांचा चांगलास गो तस्करांना आशीर्वाद असल्याचं समजते.
या ठिकाणी जारावंडी परिसरातील गावांतून आणि छत्तीसगड वरून जनावरे आणली जातात. जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु आहे.
विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे. रस्त्याने जनावरांची दर दिवस मोठ्या ट्रक ने वाहतूक भरधाव वेगाने केली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो.
जारावंडी परिसरातील गावातून व छत्तीसगड वरून जनावरे पायी जारावंडी, रोपी दिंडवि सोहंगाव मंजिगड वडसाकला, हनपायली येथे आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात.यात आंध्रप्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातील येथील जवळपास 30 ते 40 व्यापारी जारावंडी येथे  भाड्याने रूम घेऊन राहत असल्याचे दिसते
विशेष म्हणजे पोलीस स्टेशन जारावंडी आणि  परिसरातील गावामध्ये हे सर्व प्रकारसुरू आहे यात जारावंडी येथे वन उपज तपासणी नाका आहे आणि स्त्यालगत सी सी टीव्ही कॅमेरे आहेत आणि पेंडरी, गटा, कारवाफा चातगाव गडचिरोली समोर चंद्रपूर  मार्गाने वाहतूक केली जात आहे या मार्गावर शेकडो पोलीस स्टेशन आणि वन नाके येतात परंतु आज पर्यंत कोणतेच कारवाही झालेली नाही म्हणून पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत आहे.
*यांना अभय कुणाचे?*
गो तस्कर बाहेर जिल्ह्यातून येऊन थेट जारावंडी व परिसरातील गावांमध्ये वास्तव्यास आहेत आणि भर दिवसा  गुरांची ने आन करत असतात अश्यात त्यांना विचारांनी केली असता ,म्हणतात तुम्हाला जे करायचे आहे ते करा ,काय करणार जास्तीस जास्त ठाण्यात सांगणार असे ठणकावून सांगितले जातात ,म्हणून गोतस्कराबद्दल आम जाणते मध्ये प्रश्न निर्माण होत आहे,की याना अभय कुणाचे आहे
जारावंडी परिसर ठरतोय जनावरे तस्करीचा अड्डा
जारावंडी परिसरातील रोपी,मंजिगड,सोहंगाव मंजिगड हनपायली आणि छत्तीसगड राज्यातील मारोडा ही गावे गाय बैल चोरी करण्याचा अड्डा बनला आहे
येथील काही लोक त्यांचे सूत्रधार आहे,ते गावातील व परिसरातील साथीदारामार्फत   जनावरांची खरेदी,चोरी करतो, प्रत्येक दिवशी कत्तलखान्यात रवानगी केली जाते ,यासाठी चंद्रपूर  व हैद्राबाद वरून पैसे येत असल्याचे बोलले जात असून यातून मोठ्याप्रमाणात उलाढाल होत असल्याचे कळते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला...

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसपर्पण,माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली :- विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल...

रेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात… वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

ब्युरोचिफ प्रशांत शाहा चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ते घोट मार्गावर आज सकाळी सुमारे 10 वाजता दोन दुचाकीचा समोर समोर जब्बर धडक बसली. या धडकेत बोलेपल्ली येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!