Homeचंद्रपूरजिवतीजिवती पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न...

जिवती पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न…

जिवती: पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पोलीस स्टेशन मधील काल संध्याकाळची ही घटना असून परवीन गोतमवाड (26) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

ही महिला शेनगाव येथील असून तिचा शेजाऱ्यांसोबत वाद झाला होता. याची तक्रार द्यायला ती महिला पोलीस स्टेशनमध्ये पती सोबत आली होती. पोलिसांनी चौकशी करून दोन्ही पक्षावर गुन्हे दाखल करतो म्हणून म्हंटले. तेव्हा महिलेने आपल्या पतीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!