Homeचंद्रपूरवाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर...

वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर जखमी…

काल रात्री चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे एका ट्रॅक्टरला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले आहे. मृतकांमध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश असून हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

दर्शना उधवाणी (२५), प्रगती निमगडे (२४), मोहम्मद अमन (२३) आणि स्मित पटेल (२५) अशी मृतकांची नावं असून योग गोगरी (२३) हा अपघातात जखमी झालाय. योग गोगरी चा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे पाच जण काल रात्री चंद्रपुर मार्गावरील एका हॉटेल मध्ये आले होते. रात्री उशिरा परत जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला.

त्यावेळी भरधाव असलेल्या कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे. शहरातील उच्चभ्रू घरातील ४ युवक-युवतींचा असा अचानक मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!