Homeचंद्रपूरसर्वांसाठी घरे-2020’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल...

सर्वांसाठी घरे-2020’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले

चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : ‘सर्वांसाठी घरे-2020’ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवस योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन अभियान अधिक गतिमान व गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत नुकतेच जिल्हास्तरीय र्कायशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल कर्डिले बोलत होते. कार्यशाळेत प्रकल्प संचालक शंकर किरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्षी, जिल्हास्तरीय प्रोग्रामर दिपाली जवळे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारेउपस्थित होते.

प्रंधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी “महाआवास अभियान-ग्रामीण” 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसाच्या कालावधीत विभागात राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच अपेक्षित उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अभियानाअंतर्गत गरजू व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कुशल गवंडी तयार करणे, घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय डेमो हॅाऊसेस उभारणी करणे, घरकुलांच्या उद्दीष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्यांचे 100 टक्के वितरण करणे. घरकुलांच्या उद्दीष्टानुसार 100 टक्के घरकुल भौतिकदृष्ट्या पुर्ण करणे. सर्व घरकुलधारकांना भौतिक प्रगतीनुसार सर्व हप्ते प्रदान करुन घरकुले आर्थिकदृष्टया पुर्ण करणे. कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग तसेच जॉबकार्ड मॅपिंग 100 टक्के पूर्ण करणे यासह राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेला ‘महाआवास अभियानाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!