Home Breaking News बापरे १कोटी ३१ लाख 60 हजाराची फसवणूक पोलिसात तक्रार दाखल ! प्रकरणात...

बापरे १कोटी ३१ लाख 60 हजाराची फसवणूक पोलिसात तक्रार दाखल ! प्रकरणात मुजिबुर लतिफ कुरेशींसह तिघांविरोधात गुन्हा दाखल…

522

अखेर १कोटी ३१ लाख 60 हजार फसवणूक प्रकरणात मुजिबुर लतिफ कुरेशींसह तिघांविरोधात गुन्हा दाखल.

रेल्वेत टीसी नोकरीचे आमिष दाखवून 15 बेरोजगार तरुणांची फसवणूक रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
रामनगर पोलीस ठाणे व EOW कडून सखोल तपास

मुख्य संपादक इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल ९४२३०२३०६३

रेल्वेत टीसी (टिकिट कलेक्टर) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 15 बेरोजगार तरुणांकडून सुमारे 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण प्रथम 6 फेब्रुवारी 2026 रोजी उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी हालचाल करत आरोपी विरोधात अधिकृत FIR नोंदवली.
गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी कौस्तुभ विलास आदे यांच्या तक्रारीवरून दुपारी 2:55 वाजता चंद्रपूर येथील रहमत नगरचा मुजिबुर लतीफ कुरेशी, सिस्टर कॉलनीतील रविंद्र संभाजी वाघमारे आणि नागपूरचा गोधनी येथील सुरेंद्र रामकृष्ण तेलंग यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 465, 464, 468, 471, 472, 473 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रामनगर पोलीस ठाण्याचे PSI सुरेंद्र उपरे करीत असून आर्थिक गुन्हे शाखा (EOW), चंद्रपूरही समांतर तपास करत आहे.
⚠ घर-शेती गहाण ठेवून जमवले पैसे, बदल्यात बनावट कागदपत्रे
आरोपींनी सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांना रेल्वेत टीसी पदावर नियुक्तीचे आमिष दाखवले. प्रत्येकाकडून 10 ते 15 लाख रुपये रोख उकळले. अनेकांनी घर व शेती गहाण ठेवली, कर्ज घेतले आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले.
रक्कम घेतल्यानंतर तरुणांना बनावट नियुक्ती आदेश, मेडिकल सर्टिफिकेट, ट्रेनिंग प्रमाणपत्र, पोलिस व्हेरिफिकेशन आणि ओळखपत्र देण्यात आले. नंतर जॉइनिंग किंवा पैसे परत मागितल्यास आरोपींनी टाळाटाळ केली. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही आरोप आहेत.
⭐ विश्वासाचे जाळे कसे विणले गेले
2014 मध्ये शबनम शेख नावाच्या महिलेने तरुणांची आरोपींशी ओळख करून दिली. कुरेशी रेल्वेत थेट भरती करून देतो व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करत “100 टक्के खात्री” दिली गेली. त्यावर विश्वास ठेवून मोठी रक्कम देण्यात आली.
🧭 नागपूर ते कोलकाता ‘ट्रेनिंग’चा बनाव
तरुणांना आधी चंद्रपूर, नंतर नागपूर आणि विमानाने कोलकाताला नेण्यात आले. तिथे हॉटेलमध्ये ठेवून कथित “टीसी ट्रेनिंग स्कूल” दाखवण्यात आले. बनावट प्रशिक्षण देऊन नकली प्रमाणपत्रे व पोलिस सत्यापन पत्र देण्यात आले. जवळपास दीड वर्ष आश्वासने देत आरोपी संपर्क कमी करत गेले आणि फसवणूक उघड झाली.
👉 जेल, बाउंस चेक आणि खोट्या आश्वासनांची मालिका
मुख्य आरोपी पूर्वी नांदेड कारागृहात होता, असेही तक्रारीत नमूद आहे. सुटकेनंतर कार्यालये बदलून वेळ मारून नेली. दबाव वाढल्यावर दिलेले चेक बाउंस झाले. प्लॉट विक्रीच्या नावाखाली 7–8 वर्षे पैसे परत न देता टोलवाटोलवी केल्याचा आरोप आहे.
दस्तावेजी पुरावे पोलिसांकडे
EOW कडे सादर कागदपत्रांमध्ये बनावट नियुक्ती आदेश, ट्रेनिंग सर्टिफिकेट, पोलिस व्हेरिफिकेशन पत्र आणि बाउंस चेकचा समावेश आहे. पोलिसांकडून यांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.
फसवणुकीतील पीडित तरुण
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ आदी भागातील 15 युवक यात बळी ठरले आहेत. त्यात पवन वाघमारे, कौस्तुभ आदे, इकराम शेख, हरीश अकुला, गोपाल मुंडले, विपिन गणवीर, दिनेश अंड्रस्कर, अशोक सातपुते, रविंद्र वांढरे, शेख सय्यद, नागराज अंबाला, अनुप शेंडे, हरिहर मेश्राम, गंगाधर पेंडयाला आणि इमरान पठाण यांचा समावेश आहे.
❓फक्त फसवणूक नव्हे, व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ही घटना केवळ गुन्हेगारी नसून बेरोजगार तरुणांच्या असहायतेचे प्रतीक आहे. बनावट नियुक्ती पत्रे तयार होणे आणि आरोपी वर्षानुवर्षे मोकाट राहणे यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
👉पीडितांची मागणी
मुख्य आरोपी मुजिबुर कुरेशीसह सर्व आरोपींना तात्काळ अटक, संपूर्ण रकमेची वसुली आणि या रॅकेटमधील इतर दलालांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितांनी केली आहे.
👉हा गुन्हा केवळ एक FIR नाही, तर बेरोजगार तरुणांच्या उद्ध्वस्त स्वप्नांची कहाणी असून निष्पक्ष व कठोर तपास आता कायदा व्यवस्थेची मोठी कसोटी ठरणार आहे.

Don`t copy text!