HomeBreaking Newsशासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील रिक्‍त पदे तातडीने भरावी; आ. सुधीर मुनगंटीवार...

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील रिक्‍त पदे तातडीने भरावी; आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी 

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयातील प्राध्‍यापक, विशेषज्ञ, अधिपरिचारीका आदी महत्‍वाची पदे रिक्‍त असल्‍यामुळे वैद्यकिय शिक्षण तसेच रूग्‍ण्‍सेवा यावर विपरीत परिणाम होत आहेत. सदर रिक्‍त पदे तातडीने भरावी यासाठी आम्‍ही सतत शासनाचे लक्ष वेधले आहे. ही रिक्‍त पदे तातडीने भरण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.

दिनांक 15 डिसेंबर रोजी विधानसभेत पुरवणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी सदर मागणी केली. चंद्रपूर जिल्‍हयातील राजुरा तालुक्‍यातील विहीरगांव व मुर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्‍ड विमानतळ उभारणी प्रस्‍तावित आहे. सामान्‍य प्रशासन विभागाने प्रस्‍तावित विमानतळाच्‍या विकासकामांना प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता दिली आहे. वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव नियमानुसार शासनाला सादर करण्‍यात आला आहे. हा प्रस्‍ताव मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठविण्‍याची आवश्‍यकता आहे. याप्रकरणी राज्‍य शासनाने तातडीने कार्यवाही करण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्‍यान केली.

विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनांची शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-2020 ची प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्‍क प्रतिपुर्ती मिळण्‍याबाबत विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व्‍यवस्‍थापन संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे. महाराष्‍ट्रातील विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन संस्‍था आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. सहा महाविद्यालयांना शासनाकडून मिळणारी शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-2020 ची प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्‍काची रक्‍कम तसेच कोविड-19 च्‍या समस्‍येवर विद्यार्थ्‍यांकडून येणारी फी सुध्‍दा संस्‍थांना मिळणे दुरापास्‍त झालेले आहे. शिक्षण शुल्‍काची प्रतिपुर्तीची रक्‍कम मोठया प्रमाणात प्रलंबित असल्‍यामुळे कर्मचा-यांचे मागणी 5 ते 6 महिन्‍याचे वेतन अदा करणे शक्‍य झालेले नाही, त्‍यामुळे कर्मचा-यांमध्‍ये असंतोष निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेता प्रलंबित शिक्षण शुल्‍क प्रतिपुर्ती तातडीने देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान केली.

या मुद्दयांच्‍या अनुषंगाने त्‍वरीत संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश देण्‍यात येतील, असे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री तथा वित्‍तमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!