आदरणीय पवार साहेबांच्या व्हर्चुअल रॅलीला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद…

635

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा आदरणीय पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसा निमित्य मुंबई येथून प्रसारित केल्या गेलेल्या वरचुल रॅलीचे नियोजन चंद्रपूर येथील बुरडकर सभागृह येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रम यशस्वी करण्या करिता चंद्रपूर शहरातील विविध प्रभागात मिटिंग घेऊन वरचुल रॅली चे महत्व कार्यकर्त्याना समजवून सांगण्यात आले.

त्याचाच परिणाम आज दिनांक 12 डिसेंबर रोजी बुरडकर सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पवार साहेबावर प्रेम करणारे उपस्थित राहून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्चुअल रॅली च्या माध्यमातून पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पवार साहेबा बद्दल पवार साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रपूर शहरातील युवक, युवती, पुरुष स्त्री, यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन साहेबाप्रति प्रेम व्यक्त केले.

साहेबांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्याचे मनोबल उंचावले असून समाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतांना भविष्यात त्याचा उपयोग पडेल यात शंका नाही. ह्या कार्यक्रमात जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे चंद्रपूर चे निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भाऊ वैद्य युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे शहर महिला अध्यक्ष ज्योती रंगारी शहर महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे शहर युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी जेष्ठ नेते दीपक जयस्वाल महिला जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके शरद पवार विचारमनच अध्यक्ष निमेश मानकर विध्यर्थी अध्यक्ष राम इंगळे अल्पसंख्यांख अध्यक्ष नौशाद सिद्दिकी किसान सेल उपाध्यक्ष अब्दुल एजाज ओ बी सी कार्याध्यक्ष विपीन झाडे चेतन धोपटे अभिनव देशपांडे दीपक गोरडवर मेघा रामगुंडे आरिकर साहेब प्रियदर्शन इंगळे संजय खेवले मुन्ना तेमबुरकर प्रज्ञा पाटील धनंजय दानव पूजा शेतकी रेखा जाधव मंगला आखरे तराणे साहेब भोयर साहेब हर्षवर्धन पिपरे जुनघारी साहेब बोरकुटे साहेब सुनील देहगावकर रमेश दुर्योधन निलेश उपरे किशन झाडे प्रवीण जुमडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी युवक विध्यर्थी तसेच संपूर्ण सेल ह्यानि कार्यक्रम यशस्विते साठी प्रयत्न केले.