Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हयात ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना राबविण्याची मागणी; पालकमंत्री विजय वडेटटीवार यांना...

चंद्रपूर जिल्हयात ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना राबविण्याची मागणी; पालकमंत्री विजय वडेटटीवार यांना निवेदन

चंद्रपूरः चंद्रपूर जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने बिबट संवेदनशील गावामधुन बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी पालकमंत्री विजय वडेटटीवार यांचेकडे केली आहे.

जंगलालगतची किंवा जंगलव्याप्त गावातील जंगलावर निर्भरता असणारे गावकरी, गुराखी दाट जंगलात, वाघांच्या अधिवासात गेल्यानंतर वाघाकडुन मृत्यु किंवा जख्मी होतात. मात्र ‘बिबट’ सारखा वन्यप्राणी थेट गावात येतो, बिबटची खाद्य निर्भरता गावात पुर्ण होत असल्याने गावालगत त्याचा वावर असतो. त्यामुळे गावात, गावालगत किंवा शेतशिवारात बिबटयाकडुन मानव मृत्यु किंवा जखमीच्या घटना होत असतात. त्यामुळे गावातील लहान मुले, गावकरी व पाळीव जनावरे सुरक्षीत नसल्याची भावना निर्माण होते, यातुनच मानव वन्यप्राणी सघर्ष वाढतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष दुष्टीने ‘बिबट-मानव संघर्ष’ हा सर्वाधिक धोकादायक प्रकार असल्याने बिबटयाचे गावात येण्याची कारणे समजुन ती दुर केल्यास यावर समाधान मिळु शकते. याकरीता केली जाणरी उपाययोजना ग्रांमपचायत व जिल्हा परिषेदेच्या विवीध विभागाकडुन प्राध्यान्याने व नियमीत केल्यास तसेच जिल्हा परिषदेच्या विवीध विभागाशी सांगड घातल्यास जिल्हातील ही समस्या कायमची दुर होईल. याकरीता सदर ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ ही योजना अशा गावात प्राध्यान्याने राबवीण्याची गरज आहे.

सध्यपरिस्थीतीत ब्रम्हपुरी परिसरात बिबट संघर्षात नुकतेच दोन महीलांना जिव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात मागील बारा वर्षात बिबटच्या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक मृत्यु झालेले आहेत. या सर्व घटना गावात किंवा गावालगत झालेल्या आहेत. बिबटचा नेमका वावर हा गावालगत राहत असल्याने, गावावर त्याची निर्भरता असल्याने, गावासभोवताल तयार झालेले झाडी-झुडपे वाढून बिबटयास पोषक असे अधिवास निर्माण झाल्याने होत असते. एखादया गावात घटना घडु लागल्या की वनविभागाकडुन गावसभोवतलाचा परिसरात साफ-सफाई केली जाते, वाढलेली झाडी-झुडपे काढण्यात येते. ही अतिरिक्त कामे संघर्ष दरम्यान करावी लागतात, अशा घटना टाळण्याकरीता पूर्व नियोजन म्हणून जिल्हा परिषद, चंद्रपूर व्दारे विवीध विभागाशी सांगड घालुन याची अमलबंजावणीच्या अनुषंगाने पुढाकार घेण्याची तसेच जिल्हातील मानव-वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता ‘जिल्हा विकास व नियोजन निधीमध्ये’ या जिल्हयात विशेष तरतुद करण्याची गरज आहे. जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्षबाबत सदर निवेदनाची दखल घेत पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजीत बैठकीदरम्यान संबधीत वनअधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सुचना दिलेल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हासोबतच आता ‘व्याघ्र जिल्हा’ आहे. जिल्हयातील जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह सर्वाधिक वाघ असल्याचे भुषणावह बाब आहे. मात्र वाढते वाघ व वन्यप्राणी सोबतच वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष आता या जिल्हयाचा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्हयात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे. जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्षास कारणीभुत असलेले वाघ-बिबटच्या अनुषंगाने वनविभाग व जिल्हा प्रशासनाकडे संघर्ष निवारण्याच्या अनुषंगाने मागील काही वर्षापासुन इको-प्रो संस्था व मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे सातत्याने प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणुन वर्ष 2018 ला ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ या योजनेची संकल्पना इको-प्रो कडुन ठेवण्यात आली. याबाबत वेळोवेळी वनविभाग, जिल्हा प्रशासन समोर सादरीकरण केल्यानंतर, 2019 मध्ये तत्कालीन पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत सुध्दा सादरीकरण करण्यात आले. त्यांनतर ही योजना जिल्हा परीषद, चंद्रपूर तर्फे राबवीण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यासंदर्भात पहीली बैठक ब्रम्हपुरी येथे घेउन संवेनशील गावातील जनप्रतीनीधी व विवीध विभागाचे अधिकारीसोबत पार पडलेली होती. यंदा वर्षाच्या सुरूवातीला कोरोनामुळे यावर पुढे काम होऊ शकलेले नाही. यावर त्वरीत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने संबधीताना योग्य ते निर्देश देण्याची विनंती सदर निवेदनातुन करण्यात आलेली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!