Home नागपूर आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन; मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात

आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन; मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात

नागपूर , ता. १२ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे.

नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल.

सेलिब्रेशनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७, ७८२७५४१३१३, ८३०४१८०६५, ९३०७९०११८४ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….!

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

कस्तुरचंद पार्कवर हजारोंच्या संख्येने सकाळीच पोहचा… ’21 जून’ योग दिनाला सकाळी 5.30 पासून विविध कार्यक्रम..

-दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी) नागपूर: 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाला कस्तुरचंद पार्कवर सकाळी 5 .30 वाजता पासून विविध कार्यक्रमात व योग प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होण्याचे...

अन् मंजूषाचा ई-रिक्षा रस्त्यांवर धावू लागला!

एकीकडे कर्करोगाने आजारी पतीच्या उपचाराची चिंता अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेला ई-रिक्षा ४० हजारांच्या बॅटऱ्यांअभावी घरी पडून. अशा दुहेरी संकटात दिव्यांग मंजूषा पानबुडे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!