कोरोनाची साथ संपूर्ण जगात असून अनेकांचे काम बंद पडले आहेत. अश्यातच आज मूलचेरा तालुक्यातील येला या गावामध्ये वंदना रामदास उराडे (४६ वर्ष) यांचे ब्रेन ड्युमर मुळे निधन झाले. वंदना यांच्या निधनामुळे संपूर्ण येला गाव दुख सागरात बुडाला आहे.
वंदना या काबाडकष्ट करून संसाराचा गाडा पुढे चालवीत होत्या. पण नियतीने घात केला आणि दुःखाचा डोंगर उराडे कुटुंबियांवर कोसळला. वंदना यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली आहेत. दोन्ही मुलीचे लग्न झाले असून त्या सासरी असतात. पण वंदना च्या निधनामुळे पती आणि मुलगा एकटे पडले आहेत…