संवेदनेच्या प्रकाशात उजळल्या अंधारकडा

0
221

✍️ अंकुश उराडे

चंद्रपूर:- एकीकडे साऱ्या शहरात प्रकाशाची उधळण होत होती. रंगीबिरंगी फटाक्याची आसमंत निनादत होतं. घरात पंचपक्वान्नाची रेलचेल होती तर दुसरीकडे होता भयान अंधार आन् या अंधारात चाचपडत असणारे असाहाय जीव. या असाहाय जीवांच्या मनात अंधारमुक्तीचा आक्रोश होता, पण ते हतबल होते. मात्र या असाहाय वेदना आपल्या कवेत घेणारी माणस चंद्रपूर शहरातून पुढे आली.यातूनच दिवाळीच्या पर्वावर जन्म झाला स्वदेशी समाज समूह नावाच्या तरुणाचा एका ग्रुपचा.

जात, धर्म, पंथ, भाषा,व प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून ही तरुण/ तरुणी पुढे आली अन पाहता पाहता या समूहाने उपेक्षितांच्या अंतरंगातील अंधार संवेदनेच्या प्रकाशाने उजळून काढला. ‘ जया न कुणी, प्रभु मी तयांचा, हे मानवी कल्याणाचे सूत्र शिकलेल्या स्वदेशी समाज समूहात तालुक्यातील मदतीचे अनेक हात सहभागी झालेत अन् अभाग्यांना लाभले दिवाळीचे भाग्य. देऊन टाका चंद्राच्या भयग्रस्त अंधार, प्रकाशाचे दिवे आणलीत मी तुमच्यासाठी असा संदेश देणारा हा उपक्रम एक नवा आदर्श ठरावा असाच आहे या अनोख्या उपक्रमाचे सध्या चंद्रपूर शहरात चर्चा आहे. अपंग बांधव प्रकाशाला काय पारखी झालेली.त्यांच्या मनाच्या शिवारातील दिवाळीच्या प्रकाशाचे कोण अंधाराने कायम भरकटलेले मात्र तरुणांमध्ये संवेदना जागा झाला की रचनात्मक कार्याला उगम होतो. चंद्रपूरमधील तरुण-तरुणींनी सामाजिक संवनेदनेच्या मानवी भावनेतून समाजाला हाक दिली.आपल्या घरी बनवलेल्या फळाला साहित्यातील काही भाग दान देण्याचे आव्हान केले आणि पाहता पाहता तेथील गोकुळ डेअरीमध्ये फराळी साहित्याची रास लागले अपंग बांधवांच्या जीवनात प्रकाशाची उधळण व्हावी, ही भावना अधिक तेजस्वीपणे समोर आली अन् चंद्रपूर शहरातील दिव्यांग महिला आश्रमात दिवाळी साजरी..
समाजसेविका अर्चना मानलवार यांच्या दिव्यांग महिला आत्मनिर्भर केंद्रात आज अंकिता देशट्टीवार यांच्या पुढाकाराने ,प्राची नांदलवार, वेदांत देशट्टिवार, खुशाल काळे , ह्यांच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करण्यात आली. यासोबत तिथे असलेल्या सर्व महिलांशी गप्पा गोष्टी करून दिवाळीचा फराळाचा आस्वाद घेण्यात आला. ..
सर्व उपस्थितांचे औक्षवन करून मिठाई व फराळ साहित्य सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले ..प्रियंका कलोडे योगशिक्षिका ह्यांची विशेष उपस्थिती होती .
अर्चना मानलवार ह्यानी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानलेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here