प्रहारचे दिवाळीच्या दिवशीही रूग्णसेवेलाच महत्व…

420

निलेश कोयचाडे.
समुद्र्पुर. ग्रामीण प्रतिनिधी

आज सकाळी समुद्रपुर तालुक्यातील सांवगी येथिल शेतकरी गिरधरजी भोयर हे आपल्या शेतातून घरी येत असताना रस्त्यावर अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर केलेला तो हल्ला येवढा भयंकर होता की त्याच्या शरीरावर अनेक घाव करत त्याचा हातच्या अंगठ्याचे दोन तुकडे केले. त्याना गंभीर जखमी केले ते शेतकरी कसा बसा आपला जिव वाचवत त्या कुत्र्याच्या तावडीतून गावामध्ये रक्ताने माखलेल्या शरीराने धावत आले असता, तिथे प्रहारचे सांवगी शाखाप्रमुख रजत डंभारे याना ते दिसले व त्यानी त्याना सर्व घडलेला प्रकार सांगीतला रजत डंभारे यानी हि बातमी प्रहारचे समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोदभाऊ म्हैसकर याना सांगीतली.

त्यानी क्षणाचाही विलंब न करता त्या जखमी शेतकऱ्याला आपल्या स्वताच्या चारचाकी वाहनाने वर्धा जिल्हा रूग्णसेवक विनोद खंडाळकर याना सोबत घेत सेवाग्राम येथे नेत त्याना भरती करून त्याच्यावर योग्य उपचार होत पर्यंत तिथे समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोदभाऊ म्हैसकर, रूग्णसेवक विनोद खंडाळकर, शाखाप्रमुख रजत डंभारेे, मंगेश हाडके,रांजेद्र डंभारे, मिलिंद डंभारे,मारोती कापटे ठान मारुन होते.

दिवाळीचा सणाच्या दिवशीही प्रहारने सर्व प्रथम रूग्नसेवेलाच महत्व दिले आज पुन्हा एकदा सिध्द झाले कि प्रहारचा पदाधिकारी असो वा कार्यकर्ता हा स्वार्थासाठी नाही तर सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी काम करतो लोकनायक कर्मवीर मा .ना.बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यानी रूग्णसेवेचा जो अग्निकुंड सुरू केला त्याला सदैव तेजोमय ठेवण्याची काम कर्तव्यदक्ष प्रहारचे वर्धा जिल्हाप्रमुख जयंत भाऊ तिजारे याच्या नेतृत्वाखाली कधिही खंड पडु दिला जाणार नाही अशी ग्वाही आज प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता देतो आहे आज ज्या पद्धतीने एका शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्याने दिवाळी असो वा दसरा आमचे काम फक्त सेवा हि मन आज खरी केली त्याच्या ह्या कार्याला गावकंऱ्यानी सलाम करत सर्वाचे आभार मानले …