घोट येथे मोफत मोतीबिंदू भिंगारोपण तथा नेत्र तपासणी शिबिरात शेकडो सामान्य नागरिकांनी घेतला लाभ…

236

घोट प्रतिनिधी/गौरव बुरांडे 

जनसामान्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीदवाक्य घेऊन दरवर्षी अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घोट येथे गण्यारपवार फाऊडेशन चामोर्शी,महात्मे आँय हॉस्पिटल नागपुर, स्व.जागेश्वर सा गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालय घोट. प.पु.महात्मा गांधी माध्यामिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय,घोट प.पु महात्मा गांधी कॉन्हेंट स्कुल घोट,शरदचंद्र पवार कला महीला महाविद्यालय चामोर्शी याच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 15 सप्टेंबर रोजी परम पूज्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात मोफत मोतीबिंदू,भिंगारोपण व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याशिबिराचे उद्घाटन विकास सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस(श. प.)सचिव करण गण्यारपवार हे होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉ शरदपवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राजु आत्राम हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मे आय हॉस्पिटल नागपूरचे नेत्रतंज्ञ डॉ.अरविंद डोंगरवार, विकास सहकारी भात गिरणीचे उपाध्यक्ष बाबूराव भोवरे,गुरुदास वैरागडे,सुधाकर कांदो,प्रा.प्रवीण मडावी, प्राचार्य मनोज नागोसे, परमपूज्य कॉन्व्हेंट स्कूलचे प्राचार्य प्रा.अशोक कांचा, पत्रकार हेमंत उपाध्ये,विकास सहकारी भात गिरणीचे संचालक नामदेव हिचामी,बालाजी बर्लावार, हिरामण नांदेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नेत्र तपासणी शिबिरात घोट परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या शिबिरात जवळपास 530 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये 170 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान निदान करून त्यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली तसेच या शिबिरात 195 रुग्णांना नेत्र तपासणी करून चष्म्याचे मोफत वितरण करण्यात आले.याशिबिरात घोट परिसरातील घोट,सुभाषग्राम,वरुर, गांधीनगर,रेगडी,पेटतळा, विकासपल्ली,चापलवाडा, निकतवाडा,नवेगाव आदी आधी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालक व आभार निमसरकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेची शिक्षक सहकार्य केले.