भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…

0
677

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. ऋषिकेश जोंधळे यांच्यावर त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश जोंधळे यांना त्यांचे चुलत बंधू दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. यांत कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत 20 आणि 28 वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऋषिकेश यांना एक कल्याणी नावाची छोटी बहीण आहे. आज भाऊबीजचा दिवस भावाला ओवळण्याचा दिवस. मात्र आजच्याच दिवशी कल्याणीने भावाला अखेर चा निरोप दिला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here