गुजरातमधील सुरतमध्ये महीधरपुरा येथील एका महिलेने तिची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात सासरची मंडळी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २७ वर्षीय पीडित महिलेला व्हॉट्सअप वेबवरुन पती गे असल्याचे लग्नाच्या तीन वर्षांनंतर कळालं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.
गेल्या तीन वर्षांत पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवलेच नाही. अनेकदा पती काहीही कारण देत विषय टाळत होता. अखेर याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली असून पत्नीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरतच्या गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचे २०१७ मध्ये नवापुरात राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न झाले होते.
एकदा सहजपणे पतीचा मोबाईल पत्नीच्या हाती लागला. तिने पतीला न सांगता त्याचे व्हॉट्सअप व्हाट्सअप्प वेबवरुन आपल्या मोबाईल मध्ये कनेक्ट केला. त्यानंतर तिने जे काही पाहिलं त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हॉट्सअँप चॅटवरुन आपला पती गे म्हणजे समलैंगिक असल्याचे कळताच तिची झोप उडाली. एवढेच नाही तर त्याचे इतर पुरुषांशी प्रेमसंबंध आहे हे तिला कळले आणि तिला खूप मोठा धक्का बसला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. लग्नानंतर सासरच्यांकडून हुंड्यासाठी वारंवार छळ केला जात होता. सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. महिलेच्या वडिलांनी लग्नानंतर १ लाखांची रक्कम एफडीमधून काढून दिले. दुसरीकडे मुल होत नसल्यामुळे सासरच्यांकडून तिला टोमणे ऐकावे लागत होते, अशा प्रकारे अनेक छळ पीडित महिलेवर होत होते. अखेर तिने पतीबरोबरच सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली.