रेगडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर साबणे यांना निलंबित करा…शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांची मागणी…
रेगडी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल.
प्रतिनिधी गौरव बुरांडे
चामोर्शी तालुक्यातील रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक घृणास्पद बाब समोर आली आहे
रेगडी येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर नामे विजय साबणे यांनी दारूच्या नशेत दवाखान्यात उपचारा करीता आलेल्या रुग्ण व परिसरातील नागरिक यांना दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक बाब उजेळात आली.
या संपूर्ण घटनेची माहिती संतप्त रुग्णांनी गावातील सरपंच श्रीमती.सुरेखा गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिली
सरपंच महोदया व शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी गावातील काही नागरिकांना घेऊन रुग्णालयात गेले असता त्यावेळेस सुद्धा डॉ साबणे हे दारूच्या नशेत आढळून आले असून
सरकारी कर्मचारी तेही डॉक्टर जर आपली कर्तव्य बजावत असतांना दारू पित असेल तर आम्ही आता सोडणार नाही अशी भूमिका घेत
सरपंच सुरेखा गेडाम मॅडम व शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी थेट रेगडी पोलिसात तक्रार दाखल केली.
संबंधित आरोपी डॉक्टरावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी यावेळी केली आहे.
रेगडी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी डॉक्टर साबणे यांचे ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे मेडिकल करून पोस्टे रेगडी येथे कलम 296 BNS, कलम 85 महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे पोलिस उपनिरिक्षक कुणाल इंगळे आणि पोस्टे स्टाफ हे तपास करीत आहेत







