पार्वती निवासी मतिमंद विद्यालय येथे शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरू

0
208

चामोर्शी / प्रीती देवनाथ

दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय सुशिक्षित बेकार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित पार्वती निवासी मतिमंद निवासी शाळा येथे शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

सर्वप्रथम डॉ.हेलन केलर व लूईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले.केंद्राचे उद्घाटन पोलीस पाटिल सौ.रागिनी शेंडे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदित्य देशमुख सर तसेच शिक्षक श्री.जाहेदखान पठान,सत्यवान थेरकर,विनोद कुड़मते,चंदनप्रकाश पटले,सचिन कूकड़े,राहुल दहिकर,शशिकांत सोंदरकर,सुवर्णा खोब्रागडे ईतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शिघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्राद्वारे दिव्यांगत्वाचे सर्वेक्षण करणे,जन जागृती करणे,ओळख व निदान करणे,उपचारात्मक सेवा देणे,कौशल्य वैयक्तिक साहित्य पूरविने व पालकांना समुपदेशन करणे इ.कार्य केली जाणार आहेत.
पार्वती निवासी मतिमंद विध्यालय येथे शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरु केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.निलकंठ दहिकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here