स्मार्ट ग्राम बिबी येथे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

0
246

गडचांदुर

ग्रामसफाईने दिवसाची सुरुवात

गडचांदूर – सर्वधर्मसमभाव व देशाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना स्मार्ट ग्राम बिबी येथे श्री. गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत युवा मंडळाच्या वतीने मौन श्रद्धांजली देण्यात आली.
दरवर्षी गावातून गुरुदेव भक्त मोझरी येथे श्रद्धांजली कार्यक्रमासाठी जात असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे मोझरी येथील कार्यक्रम रद्द झाल्याने गुरुदेव भक्तांनी गावातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली दिली. सकाळी गावात ग्रामस्वच्छता करून रामधून काढण्यात आली व सायंकाळी मौन श्रद्धांजली देऊन सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. दरम्यान श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात नियमित प्रार्थनेला येणाऱ्या १६ महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळा देखरेखीकरिता राष्ट्रसंत पुतळा समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, सचिव बापूजी पिंपळकर, कोषाध्यक्ष आनंदराव पावडे, माजी सभापती तथा राष्ट्रसंत पुतळा समितीचे सचिव साईनाथ कुळमेथे, उपसरपंच आशिष देरकर, राष्ट्रसंत युवा मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती ढवस, सचिव विठ्ठल टोंगे, सदस्य शामकांत पिंपळकर, सचिन आस्वले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर अस्वले, श्रावण चौके, रामदास देरकर, कवडु पिंपळकर, किसन भडके, भास्कर भडके, राष्ट्रसंत पुतळा समितीचे अध्यक्ष देवराव आष्टेकर, उपाध्यक्ष श्रीरंग उरकुडे, सहसचिव साईनाथ ठाकरे, सदस्य दादाजी भेसुरकर, विलास राजुरकर, कृष्णा झाडे, जगदीश देरकर, अखिल मेश्राम, सुधाकर मिलमिले, प्रकाश बोंडे, माजी उपसरपंच राजकुमार हेपट, उत्तम काळे, शेख पापा, उदय काकडे, लोकेश कोडापे, चंदू पिंपळकर, नितेश बेरड, संदीप पावडे, राजू पिंपळकर, सुरज लेडांगे व गावातील बहुसंख्य महिला व पुरुष गुरुदेव भक्त उपस्थित होते.
गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापूजी पिंपळकर यांनी सामुदायिक प्रार्थनेमध्ये मौन श्रद्धांजलीनिमित्य मार्गदर्शन केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here