पार्सेवाडा येथिल धबधबा उपेक्षित

0
171
Advertisements

 

सिरोंचा / प्रीती देवनाथ

सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 70 किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील पार्सेवाडा येथील 25 फूट उंच धबधबा आजही शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षितच आहे,
आताच्या सिरोंचा तालुक्याला ब्रिटिश काळात जिल्ह्याचा दर्जा होता या क्षेत्राची दंडकारण्य म्हणून ओळख होती,आजही हा परिसर जंगलव्याप्त आहे,तालुक्याचा विकास मात्र ब्रिटिश गेल्यानंतरही खुंटला आहे,पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सिरोंचा तालुक्यात पार्सेवाडा परिसरात 500 मीटर अंतरावर जंगलात 25 फूट असा उंच मनमोहक एकमेव धबधबा आहे,या धबधब्यापर्यंत जाण्याची वाटही अतिशय बिकट आहे,पावसाळ्याच्या दिवसामध्ये धबधबा परिसरात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे परिसरातील आदिवासी बांधव सांगतात,
या धबधब्याबाबत तालुक्यातील फारच कमी जणांना माहिती आहे, असा मनमोहक धबधबा जिल्हात कुठेच नसल्याचे बोलले जाते या क्षेत्रास पर्यटनाचा दर्जा दिल्यास स्थनिकांना रोजगार प्राप्त होऊन गाव परिसराचा विकासासुद्धा होऊन शंकतो,पावसाळ्याच्या दिवसात धबधबा परिसरात सुगंध दरवळत असतो,
पार्सेवाडा परिसरातील धबधबा पावसाळ्याच्या दिवसात अधिकच मनमोहक असतो ,मात्र धबधबा घनदाट जंगलात असल्याने तेथपर्यंत पोहोचणे काठाणी जाते येथे जाण्यासाठी रास्तासुद्धा नाही या परिसरात जंगली शवापदांचीही रेलचेल राहत असल्याने बरेचसे नागरिक या परिसरात भेट देण्यात टाळत असतात, फारच कमी व्यक्ती जीव मुठीत घेऊन परिसरात भेट देतात, धबधबा तालुक्यातील एकमेव धबधबा असून याची माहिती बऱ्याच नागरिकांना अद्यापही नाही ,तसेच हा परिसर वनविभागाने पूर्णतः आरक्षित केल्याने या परिसराचा विकास होणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे, धबधब्यापर्यंत जाण्यास वनाविभागेने पुढाकार घेऊन मार्ग तयार करणे आवश्यक आहे, तसेच शासन प्रशासने या परिसरात पर्यटनाचा दर्जा मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे,.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here