गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा
मागील तीन ते चार दिवसापासून घोट वनपरिक्षेत्र हद्दीत बिबट्याची दहशत होत असल्याचे दिसून येत आहे
काल रात्रो रेगडी येथून अवघ्या 7 किमी अंतरावर असलेल्या मूलचेरा तालुक्यातील व वेंगणुर ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या पडकोटोला या गावात बिबट्याने रात्री सुमारे दहा वाजताच्या दरम्यान एका बैलाला ठार केल्याची घटना समोर आली आहे
घटनेची माहिती पडकोटोला येथील गावकऱ्यांनी वनविभागाला कळविली व नुकसान झालेल्या शेतकरी श्री,बंडू बैरा कोवासे यांना आर्थीक मदत द्यावी अशी मांगणी वनविभागाकडे पडकोटोला येथील पोलीस पाटील श्री,प्रभू पडको,श्री,रामदास पडको,श्री,सुनील तुमरेटी, श्री,जेट्टी पुंगाटी व गावकरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ घोट वनपरिक्षेत्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मोका पंचनामा करण्यात आला.
यावेळी श्री,एल एस करमरकर साहेब क्षेत्रसहायक रेगडी,श्री एल आर उसेंडी साहेब वनरक्षक पडकोटोला,श्री एस पी धानोरकर साहेब वनरक्षक रेगडी,श्री एच डी परसा साहेब वनरक्षक वेंगणुर,श्री रमेश एस पावे रेगडी,श्री प्रशांत शाहा पत्रकार रेगडी, यांच्या सह पडकोटोला येथील गावकरी घटनास्थळी उपस्थित होते
मागील तीन ते चार दिसवात परिसरात ही तिसरी घटना घडल्याने व अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून घोट,रेगडी,सुभासग्राम,वेंगणुर सह मूलचेरा परिसरात पण दहशत निर्माण झाली आहे.