Homeगडचिरोलीबिना नंबरचा हायवा ट्रक / ट्रैक्टर चालविणा-या मालकावर आरटीओ कायद्यानुसार कारवाई केली...

बिना नंबरचा हायवा ट्रक / ट्रैक्टर चालविणा-या मालकावर आरटीओ कायद्यानुसार कारवाई केली जावी

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी – नितेश खडसे

सोमवारला नायब तहसीलदार यांनी केलेल्या आणखी एका कारवाईत अवैध मुरूम वाहतूक करणा-या दोन हायवा जप्त केल्या आहेत. मौजा दर्शनी माल येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा-या एस. जी. कंस्ट्रक्शन कंपनीेचे दोन हायवा रात्रिची अवैध वाहतूक करताना आढळून आले. त्यांचे कडे वाहतूक परवाना नव्हता सबब दोन्ही हायवा चालकांसह जप्त करण्यात आले आहेत . तसेच दुसरी कडे सोमवारी ऊशीरा रात्रि महसूल विभागाचे ऊपविभागिय अधिकारी आशीष येरेकर यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्हा युवक कॉंग्रेसचे महासचिव व मंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कुणाल पेंदोरकर व कृष्णकांत कोतपल्लीवार या दोघांचे दोन ट्रैक्टर कनेरी गावाच्या हद्दीत वैनगंगा नदीपात्रातून रेतीची तस्करी करून रेती चोरून नेताना रंगेहात पकडले.आरटीओच्या कायद्यानुसार बिना नंबर प्लेटचे किंवा टेंपररी नंबर प्लेटचे वाहन रस्त्यावर चालविता येत नाही. रेती तस्करीच्या सदर प्रकरणात कुणाल पेंदोरकर यांच्या ट्रैक्टर व ट्रालीवर नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. कारवाई अधिकारी नायब तहसीलदार मोहरे यांनी सांगितले की या मुद्यावर आरटीओकडूनही चौकशी करण्यात येईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!