अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करा ; राजेश डोडीवार यांची मागणी

0
294
Advertisements

गोंडपिपरी

गोंडपिपरी तालुका अंतर्गत येत असलेल्या कोठारी तोहोगाव- आर्वी
रस्त्याचे अर्धवट असलेल्या बांधकाम पूर्ण करण्यात यावे यासाठी सहाय्यक अभियंता गोंडपिपरी यांना सामाजिक कार्यकर्ता राजेश डोडीवार यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोठारी तोहोगाव आर्वी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी अंदाजीत निधी 247.75 लक्ष असून या बांधकामाचे भूमिपूजन 31 जानेवारीला पार पडले. त्यानंतर सदर कामाला सुरुवात करण्यात आली. अशातच देशावर कोरोना चे संकट ओढवले आणि काम ठप्प पडले.त्यामुळे अर्धवट झालेले बांधकाम आजतागायत त्याच अवस्थेत असल्याने या मार्गाने वाहतूक करणे मोठे कष्टाचे झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर बांधकामासाठी टाकण्यात आलेली गिट्टी, मुरूम अस्ताव्यस्त झाल्याने या मार्गाने प्रवास करताना अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोठारी तोहोगाव आर्वी या अर्धवट असलेल्या मार्गाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे.या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता राजेश डोडीवार यांनी सहाय्यक अभियंता गोंडपिपरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here