नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सफाई कामगारांना मास्कचे वाटप

0
128

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी- नितेश खडसे

देहात संस्था व दि गुड कन्सल्टशी मुंबई यांच्या वतीने गडचिरोली नगरपरिषद येथील सफाई कामगारांना नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते मोफत २०० मास्कचे वाटप करण्यात आले.
जिल्यात कोराना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावीत आहेत.आज गडचिरोली नगरपरिषद येथिल सफाई कामगाराना १०० तर आशावर्कर,अंगडवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी यांना १०० असे एकूण २०० मास्कचे AIH-UNISEF जिल्हा समन्वयक सोपान कठाने यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.यावेळी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम,माजी सभापती प्रशांत खोब्रागडे, दलित आघाडीचे देवाजी लाटकर,विलास नैताम,सीमा खोब्रागडे व नगर परिषद येथिल कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here