मालदुगी येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके यांचा शहिद दिवस साजरा

0
245

 

कुरखेडा प्रतिनिधी/रमेश कोरचा

Advertisements

कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे पहांदि पारि कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ व सार्वजनिक गोंडवाना वाचनालय च्या वतीने शहिद बाबुराव शेडमाके यांचा शहिद दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला साहित्यिक डाॅ. पितांबर कोडापे, नगरसेवक रमेश कोरचा, नितिन मोहने, सि.आर.नैताम, नंदकिशोर नैताम,काशिराम माडमवार,सुषमा नैताम, किसन तुलावी आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम सल्ला गांगरा शक्ती,वीर बाबुराव शेडमाके, नारायणसिंह उईके यांच्या प्रतिमेला मालार्पन करण्यात आले. वीर बाबुराव शेडमाके यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपला जीव अर्पण केले अश्या महामानवाच्या कार्यातुन नविन पिढीने बोध घ्यावा,असा सुरू मान्यवरांनी काढला.कार्यक्रमाचे संचालन लिलाधर नैताम तर आभार रेशिम तुलावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल नैताम, हेमराज धुर्वे, पंकज तुलावी, हेमंत मडावी,तृषा नैताम, पलक नैताम, सुहाना नैताम, रजत करंगाम, आयुष तुलावी यांनी केले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here