पोलीस मदत केंद्र रेगडी येथे पोलिस कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ

0
793

 

गडचिरोली  जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

Advertisements

गडचिरोली:
आज दिनांक 21/10/2020 रोजी पोलीस मदत केंद्र रेगडी येथील 25 पेक्षा अधिक पुरुष व महिला कर्मचारी यांचे स्थलांतर झाले असल्याने पोलीस मदत केंद्र रेगडी येथिल स्थलांतर झालेले सर्व कर्मचारी वृंदाचे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रमात सर्व कर्मचारी यांना शाल व श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला.
या वेळी पोलिस मदत केंद्र रेगडी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री, धनाजी खापरे साहेब यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिली यावेळी भाऊक अंतकरणाने त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
बदली झालेले सर्व कर्मचारी हे रेगडी येथील पोलीस मदत केंद्राची स्थपना झालेल्या 17/11/2015 पासून नक्सल प्रभावित असलेल्या रेगडी पोलीस मदत केंद्र येथे आपली चांगली कामगिरी बजावली आहे
स्थलांतर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे रेगडी गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या रेगडी या गावात चांगली अशी केलेल्या कामगिरी व सर्व गावकऱ्यांशी मिळून मिसळून राहल्याने स्थलांतर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत स्थलांतरित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार पण मानले आहेत.

Advertisements

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here