जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

0
103
Advertisements

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते शुभारंभ

गडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम

Advertisements

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांची जनजागृती जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली विभागातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार केलेल्या चित्ररथांचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथांना मार्गस्थ केले. शुभारंभ कार्यक्रमावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, भारत मेश्राम, दिनेश वरखेडे, मनोहर बेले व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढील 14 दिवस जिल्हयात विविध शासकीय योजना यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, सामुहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्यांसाठी शासनाचे अर्थ सहाय्य, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना व इतर योजनांबाबतची जनजागृती या चित्ररथांद्वारे जिल्ह्यात करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत आवश्यक योजनांची माहिती पोहचावी व त्यातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाकडून दरवर्षी विविध योजनांची प्रसिद्धी केली जाते. याचाच भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात दोन चित्ररथांद्वारे प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यावेळी चित्रफित, जिंगल्सचा वापर करून स्क्रीन वरती लोकांना माहिती दिली जाणार आहे. यावेळी गावोगावी नागरिकांनी या माहितीचा लाभ घ्यावा तसेच यावेळी वाटप करण्यात येणाऱ्या घडिपत्रिकांमधून योजनेचे तपशील घ्यावेत असे आवाहन विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here