Homeगडचिरोलीजारावंडी येथे ग्राम कृषि विकास समितीची स्थापना

जारावंडी येथे ग्राम कृषि विकास समितीची स्थापना

गडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम

ग्रामपंचायत सभागृह जारावंडी येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सभेमध्ये शासनाच्या ग्राम कृषि विकास समितीची स्थापने बाबतच्या अध्यादेशाचे वाचन करण्यात आले. अध्यादेशास अनुसरुन समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच ग्रामपंचायत जारावंडी सुधाकरजी नरोटी, उपाध्याक्ष म्हणून उपसरपंच जारावंडी, सचिव म्हणून सचिव ग्राम पंचायत जारावंडी, सहसचिव म्हणून कृषि सहाय्यक जारावंडी, व अध्यादेशाप्रमाने इतर सदस्य यांची निवड करण्यात आली.

सभेला मार्गदर्शन करतांना श्री. ब-हाटे यांनी ग्राम विकासासाठी ग्राम कृषि विकास समितीची गरज विषद करतांना शेतक-यांना वेळोवेळी उदभवना-या समस्या व त्यांचे निराकरण, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, बांबू लागवड, एकात्मीक किड व्यवस्थापन, महिलांचा कृषि विकासात सहभाग, विकेल ते पिकेल च्या अनुषंगाने गावाने करावयाचे नियोजन इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. सिंचन सुविधा, मत्स्य व्यवसाय, पिकांचे मुल्यवर्धन मध्ये मक्यापासून कोंबडी खाद्य, मासोळी खाद्य तयार करणे तसेच कृषि विभागाच्या इतर विविध योजनांची माहीती देवून सदर योजनांची अंमलबजावणी सुलभ रितीने होण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सभेमध्ये सरपंच जारावंडी श्री.नरोटे यांनी कृषि विकासाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये कृषि निवीष्ठांचा पुरवठयांचा तुटवडा, उत्पादित मालांची विक्रीबाबत अडचणी, कुटीरउद्योग, लघूउद्योग पत पुरवठा अडचणी इत्यादी समस्या मांडल्या.
तालुका कृषि अधिकारी एस.ए.गायकवाड यांनी सभेला संबोधन करतांना प्रथम अध्यादेशाचे वाचन केले. कृषि विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, फळबाग लागवड, कृषि यांत्रीकीकरण, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक किड व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मत्स्यपालन, आळींबी लागवड, सेंद्रीय शेती उत्पादने इत्यादींबाबत मार्गदर्शन करतांना येणाऱ्या अडचनी व त्यावरील उपाययोजना यांची सखोल माहीती दिली.

ग्रामसभेला जारावंडी सरपंच सुधाकर नरोटी, तालुका कृषि अधिकारी, एटापल्ली एस. ए. गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी कसनसूर जे. डी. दमाहे, कृषि अधिकारी एटापल्ली एस.जी. माने, कृषि पर्यवेक्षक एच. के राऊत, कृषि सहाय्यक जी. एस. हिचामी, एल. पी. मटटामी, एस. एम. गेडाम, बि. टी. एम. आत्मा समिर पेदापल्लीवार ग्राम पंचायत सदस्य गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. कृषि विभागाच्यावतीने श्री. पेदापल्लीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!