जागतिक बालिका दिनानिमित्ताने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

278

गडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही केंद्र पुरस्कृत योजनाराज्यातील सर्व जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्याचा दृष्टीकोनातुन जनजागर मोहिमेअंर्तगत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 11 ऑक्टोबर 2020 रोजी जागतिक बालीका दिनाचे अवचित्य साधुन बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान व्यापक स्वरुपात जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक कृतीचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हयात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव बघता योजनेची अंमलबजावणी जिल्हयात व्हावी या दृष्टीकोनातुन कार्यक्रम, दिनांक 11 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याकरीता पुढील कृती करण्यात यावी.
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा लोगो य टॅगलाईन वापरुन वैयक्तिक सामजिक माध्यमांवर DP व कार्यालयीन WhatsApp Group वर DP ठेवणे (सदर लोगो व Tagline खालील भ्रमणध्वनी वरुन संपर्क करुन प्राप्त करुन घेणे). Officemail ID वर बेटी बचाओ, बेटी पढाओ Logo ठेवणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ Logo ची रांगोळी काढणे व फोटो पाठवणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर चित्र काढणे.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर वकृत्व स्पर्धा घेणे (वैयक्तिक) 3 ते 5 मिनीटांची Video Clip तयार करुन पाठवणे. यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी कार्याचे लेखन (150 शब्दात) करणे. (कार्यालयाच्या mail id वर पाठविणे). मुलींच्या जन्माचे स्वागत फोटो काढणे. Selfi with Daughter फोटो काढणे. बेटी बचाओ,बेटी पढाओ या विषयावर कविता वाचन/ लेखन Video mail वर पाठविणे. बेटी बचाओ,बेटी पढाओ या विषयावर घोषवाक्य तयार करणे. राष्ट्रीय महिला नेत्यांचा पोशाख परिधान करुन फोटो काढणे.
15 वर्षाखालील दोन मुली असलेल्या कुटुंबाच्या (family photo) फोटो काढुन पाठविणे. वरील वैयक्तीक कृतीकरुन खालील दिलेल्या Mail ID व तालुका निहाय Whatsaap नंबर वर स्पर्धकाचे नांव व पत्ता. Mail ID व भ्रमणध्वनी क्रमांक पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकच कृतीचा फोटो सादर करता येईल. याकरीता संबंधित अधिकारी यांचे नाव व दुरध्वनी क्रमांक दिलेला असून त्यांचेशी संपर्क साधण्यात यावे.
अविनाश गुरनुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली- मो. 9403704834, कवेश्वर लेनगुरे संरक्षण अधिकारी संस्थात्मक, आरमोरी- 9595644848, कु. प्रियका आसुटकर संरक्षण अधिकारी संस्थाबाहय, चामोर्शी- 9975033601, दिनेश बोरकुटे जिल्हा समन्वय चाईल्ड लाईन, कोरची- 9421432150, कु.मनिषा पुप्पालवार-डाटा एट्री ऑपरेटर, सिरोंचा- 8275673478, निलेश देशमुख-क्षेत्रकार्यकर्ता, धानोरा- 8657577115, सौ.पुजा धमाले-लेखापाल, मुलचेरा- 8626008562, जयंत जथाडे सामाजिक कार्यकर्ता, अहेरी- 9421731325, कु.उज्वला नाकाडे डाटा विश्लेषक, वडसा- 8698361830, रविद्र बंडावार क्षेत्रकार्यकर्ता, कुरखेडा- 9405132152, स्नेहल डांगे टिंम मेबंर चाईल्ड लाईन,एटापल्ली -7507101156, श्रीमती मोनीका वासनिक टिम मेबंर चाईल्ड लाईन, भामरागड- 7721975963 तसेच कार्यालयाच्या पुढील ई-मेल dcpu.gadchiroli@gmail.com वर संपर्क साधावा. चांगल्या वैयक्तिक कृती ची निवड करुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. सदर सर्व कृती ही वैयक्तिक स्वरुपाची असुन कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेवुन मास्क व Social distance इ. सर्व मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.