चंद्रपूरातील वैद्यकिय दवाखाच्या सुविधांचा अभाव पोहचला हाय कोर्टात

0
151

 

चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गेल्या सहा महिन्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटरची सुविधा नाही, डॉक्टर्स नाही. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. या प्रकरणी आता न्यायव्यवस्थेचे हस्तक्षेप करावा म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेअंतर्गत न्यायालयाने नागपूर विभागाचे आयुक्त, चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते शासकीय वैद्यकीय, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, , मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय), तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सैनिकी शाळेत कोविड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, वेळेत हे काम पूर्ण झालेले नाही. शहरातील 17 खासगी रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. ‘खासगी डॉक्टरांना विरोध नाही.

पण सर्वसामान्य कोरोनाबाधित रुग्ण लाखो रुपये खर्च करून खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. खासगी रुग्णालयात एका रुग्णाला किमान लाख रुपये खर्च येत आहे. त्यामुळे या सर्व सुविधा राज्य सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण करणे अपेक्षित आहे’, असे याचिकाकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here