चामोर्शी / प्रतिनिधी नितेश खडसे
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपा गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे वतीने आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर चामोर्शी येथे निषेध आंदोलन करण्यात आले
नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होणार असून आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्याही परिस्थीतीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती त्वरीत महाराष्ट्रातून उठवावी व राज्यात केंद्राच्या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.
आज संपूर्ण गडचिरोली विधानसभा मतदार संघात
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार डॉ देवराव होळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष नगरसेवक रमेश भुरसे , जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे , भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष भास्कर बुरे , भाजप बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे , भाजप नेते विकास मैत्र
जयराम सावकार चलाख युवा नेते भुवनेश्वर चुधरी ,प्रतीक राठी व पदाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी , भाजप नेते किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष रमेश भुरसे सभापती रमेश भाऊ बारसागडे यांनी मार्गदर्शन केले ,
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किसानों के सन्मान में मोदी सरकार मैदान में, स्थगिती रद्द करा शेतक-यांना न्याय द्या, महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम, कृषी विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करा, महाविकास आघाडी नव्हे तर महाबिघाडी सरकार अशा घोषणांचे फलक फडकावत घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार निषेध केला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख यांनी केले, यावेळी आमदार डॉ देवराव होळी व भाजप नेते रमेश भूरसे ,कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भास्कर बुरे , भाजपा बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब यांना सादर केले. या आंदोलनात सोशल डिस्टन्सींग चे पालन करीत समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.